विजय वडेट्टीवार यांच्या अनोख्या शुभेच्छा; म्हणाले, तरचं…
यावेळी वडेट्टीवार यांनी माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं, हिच प्रार्थना असल्याचे म्हटलं आहे
नागपूर : आज मराठी नवीन वर्षाचा दिवस आणि गुढीपाडवा असल्याने राज्यात उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सामान्यांसह राजकिय नेते देखील या आनंदात सामिल होताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या घरी गुढी उभारत गुढीपाडवा साजरा केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यांच्या घरी परिवारासह घरी गुढी उभारली आहे.
यावेळी वडेट्टीवार यांनी माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं, हिच प्रार्थना असल्याचे म्हटलं आहे. तर यंदाचं हे वर्ष परिवर्तनाचं ठरो. महागाईपासून महाराष्ट्रातील जनतेची मुक्ती व्हावी असही त्यांनी म्हटलं आहे. तर राज्यात सत्ता बदलाचा संकल्प केल्याचं त्यांनी सांगितलं.
Published on: Mar 22, 2023 01:08 PM