…तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?

| Updated on: Dec 12, 2024 | 1:11 PM

सोलापूरच्या माळशिरस येथील मारकडवाडी गावाने ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकले आहे. या गावातील मतदारांना बॅलेट पेपरवर निवडणूका लढविण्याचा अभिरुप प्रयोग करून आपलेच मतदान तपासण्याचा केलेला प्रयत्न प्रशासनाने उधळून लावला असला तरी गावातील लोकांचे देशभरात कौतूक केले जात आहे.

सोलापूरच्या माळशिरस येथील मारकडवाडी गावाचे नाव देशभरात झालेले आहे.माळशिरस येथे अभिरुप बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला होता. प्रशासनाने गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करीत अशा प्रकारे अभिरुप मतदान घेण्यावर बंदी घातल्याने हे गाव देशभरात एका रात्रीत चमकले आहे. हे गाव ज्या मतदार संघात येथे तेथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी या संदर्भात आपल्या १ लाख १० हजार मतदानाची हेराफेरी झालेली आहे अशा आरोप कायम ठेवला आहे. आपण या संदर्भात इलेक्शन कमिशनकडे दाद मागणार आहोत. जर इलेक्शन कमिशनने न्याय दिला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.तेथेही न्याय नाही मिळाल तर राहुल गांधींच्या आंदोलनात भाग घेणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. ईव्हीएम विरुद्ध भूमिका घेतल्याने आपले अनेक खासदारांनी कौतूक केले आहे. निवडणूक आयोगाला समोर यावेच लागले, आणि आपले मत नेमक कुठे जातंय हे मतदाराला दाखवावेच लागेल. जर इलेक्शन कमिशनने असे केले नाही तर यापुढे मी ईव्हीएमवर मतदान करणार नाही. ईव्हीएमवर निवडणूकही लढविणार नाही असे जानकर यांनी म्हटले आहे.

 

Published on: Dec 12, 2024 01:08 PM