अत्यंत कमी खर्चात लग्न केले, नव दाम्पत्य मनोज जरांगेंच्या भेटीला आले

| Updated on: Jan 01, 2024 | 12:53 PM

श्रीमंत मराठा असो की गरीब मराठा सर्वांनी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा सल्ला मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे नेहमी आपल्या भाषणातून देत असतात. त्याचा आदर्श आता मराठा तरुणांनी घेतला आहे. आता मराठा तरुण साध्या पद्धतीने लग्न करीत आहेत. आणि खर्च टाळून कर्जाच्या विळख्यातून स्वत:ची सुटका करीत आहेत. अशा साध्या पद्धतीने लग्न करणाऱ्या एका नव दाम्पत्याने मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

जालना | 1 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला नवा नेता दिला आहे. मनोज जरांगे पाटील नेहमी आपल्या भाषणातून मराठा तरुण आणि तरूणींना कमी खर्चात लग्न करा. तो पैसा व्यवसायात किंवा इतर चांगल्या कारणासाठी वापरण्याचा सल्ला देत असतात. त्यांच्या सल्ला शिरसावंज्ञ मानून आता मराठा तरुण आणि तरुणी कमी खर्चात लग्न करु लागले आहेत. अशाच एका नव दाम्पत्याने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. रात्री एक शेगाव तालुक्यात देखील एक लग्न अशाच पद्धतीने कोणताही डामडौल न दाखविता अत्यंत साध्या पद्धतीने झाले आहे. आता कोणताही हुंडा न घेता अशा साध्या पद्धतीने लग्न करुन या नव दाम्पत्याने जगासमोर नवा आदर्श ठेवला आहे. गणेश भैय्याने जसे साधे पद्धतीने लग्न केले तसाच आदर्श सर्वांनी ठेवला पाहीजे.

 

Published on: Jan 01, 2024 12:44 PM
मविआ आणि महायुतीत लोकसभांच्या जागांवरुन मोठा भाऊ बनण्याची लागली स्पर्धा
दादांमुळेच सुप्रिया सुळे निवडून आल्या, रुपाली चाकणकर यांनी केला दावा