Kishori Pednekar | कोरोना कमी झाल्याने मुंबईतील काही कोव्हिड सेंटर बंद
मुंबईत सध्या कोरोनाचे संकट कमी होत आहे. त्यामुळे काही कोव्हिड सेंटर बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ही सेंटर कायमस्वरुपी बंद ठेवली जाणार नाही. जर वेळ पडली तर ती पुन्हा सुरु करु, असेही महापौर म्हणाल्या.
मुंबईत सध्या कोरोनाचे संकट कमी होत आहे. त्यामुळे काही कोव्हिड सेंटर बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ही सेंटर कायमस्वरुपी बंद ठेवली जाणार नाही. जर वेळ पडली तर ती पुन्हा सुरु करु, असेही महापौर म्हणाल्या. मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संकटाशी लढत आहेत. त्यामुळे जोपर्यंत मुंबईची स्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा टाकणार नाही. या निर्णयानंतर काही जण म्हणतील की आम्ही निवडणूक आल्याने असं बोलत आहोत. पण ते चुकीचं आहे. विरोधकांना बोलत राहू द्या. आम्हाला लोक महत्त्वाचे आहेत, असेही महापौर म्हणाल्या.