पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक

| Updated on: Oct 17, 2024 | 1:33 PM

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाने मराठवाड्यात लोकसभेला भाजपाला मोठा फटका बसला होता. बीडमधून पंकजा मुंडे आणि जालनातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेत जरांगे यांची वंचित सोबत आघाडी होऊन ते उमेदवार उभे करतात की याचा फैसला ते येत्या 20 ऑक्टोबरच्या बैठकीत घेणार आहेत.

राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळाल्या शिवाय आचारसंहिता लागू होणार नाही असे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. परंतू  विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू झाली असून आरक्षणाचा कोणताही फैसला न झाल्याने आता मनोज जरांगे यांनी आरपारची लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात येत्या 20 तारखेला जरांगे पाटील यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनिती ठरविण्यात येणार आहे. पाडापाडी की लढायचं याचा फैसला 20 तारखेला होईल आणि तो अंतिम फैसला असेल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला आरक्षण देण्याचे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात होते. परंतू देवेंद्र फडणवीस यांनी ते होऊ दिलं नाही असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे यांच्यावर कधीच टीका करीत नाहीत नेहमी देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने भाजपाला टार्गेट करीत असतात असा आरोप भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. आरक्षण देण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे त्यांच्या विषयी बोलत नाहीत. पवारसाहेब पन्नास वर्षे सत्तेत होते. त्यांनी आरक्षण दिले नाही त्यांच्यावर जरांगे टीका करीत नाहीत असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.

 

Published on: Oct 17, 2024 01:29 PM
विरोधक-सत्ताधारी दोघेही ‘मुख्यमंत्री पदा’ चा चेहरा जाहीर करेनात, दोघांचे ‘पहेले आप’ सुरुच
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, पहिल्या यादीत मोठे चेहरे?