राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदारांची संध्याकाळी वरळीतील हॉटेलमध्ये बैठक

| Updated on: Jun 09, 2022 | 10:34 AM

मागच्या दोन दिवसांपासून राज्यात दोन पक्षात संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपकडे दोन जागा जिंकण्यासाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत शिवसेनेकडे संख्याबळ आहे. तथापि, आपला दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी त्याला मित्रपक्ष आणि इतर अपक्षांकडून आणखी 30 मतांची आवश्यकता आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात दोन पक्षात संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 09, 2022 10:34 AM
विमान प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक
देशमुख आणि मलिकांच्या मतदानाच्या अर्जावर आज निर्णय