Sambhaji Raje | संभाजीराजे फडणवीसांच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत चर्चा
खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. दुपारी 12.15 च्या सुमारास दोघांची भेट झाली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) त्यांची भूमिका जाणून घेतली. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ही भेट नियोजित आहे. त्यानंतर संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. दुपारी 12.15 च्या सुमारास दोघांची भेट झाली.
Published on: May 28, 2021 01:16 PM