मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

| Updated on: May 08, 2022 | 11:14 AM

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून रविवारी 8 मे रोजी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून रविवारी 8 मे रोजी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.39 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Published on: May 08, 2022 11:14 AM
राष्ट्रपती Ram Nath Kovind यांच्या हस्ते IIM नागपूर कॅम्पसचं उद्घाटन
धार्मिक स्थळांसह लग्नसमारंभातील भोंगे आणि डिजेंवर मर्यादा येणार