राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं अजित पवार यांना आव्हान; म्हणाले, “…तर 40 आमदारांचा फोटो दाखवा”
अजित पवारांनी बंडानंतर दोन्ही गटांकडून आज बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांच समर्थन आहे? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. दोन्ही गटांकडून आज बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांच समर्थन आहे? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तर मग त्यांनी या आमदारांचा फोटो दाखवावा, सिद्ध करून दाखवावं की त्यांना आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही शरद पवार साहेबांसोबत आहोत. ही विचारांची आणि तत्वांची लढाई आहे, असं ते म्हणाले.
Published on: Jul 05, 2023 02:16 PM