मणिपूर हिंसाचार : विद्यार्थी सुखरूप येतील, शरद पवार यांचे आश्वासन; मुख्यमंत्र्यांशी फोनाफोनी… पण
गोविंद बाग येथे भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना मणिपूर येथील IIIT शैक्षणिक संस्थेत अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आला. सांगली येथील एक कुटुंब यासाठी भेटले.
बारामती : मेईतेई समुदायाला (Meitei community) एसटी दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार (Manipur violence) सुरू होता. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र या हिंसाचारात 54 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 100 लोक जखमी झाले आहेत. तर महाराष्ट्रातील काही विद्यार्थी हे मणिपूरमध्ये अडकलेले आहेत. यावरून आज सांगली येथील एक कुटुंबाने शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली. तसेच मणिपूर येथील IIIT शैक्षणिक संस्थेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्याबाबत विनंती केली. त्यावरून शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद बाग येथे भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना मणिपूर येथील IIIT शैक्षणिक संस्थेत अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आला. सांगली येथील एक कुटुंब यासाठी भेटले. यासंदर्भात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मी त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा संपर्क करणार आहे. तर राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणण्याबाबत लक्ष घालावे अशा सुचना करणार असल्याचे ते म्हणाले. तर संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाला विद्यार्थी सुखरूप येतील असे आश्वासन दिल्याचे पवार यांनी सांगितलं आहे.