VIDEO : कराडमध्ये माथेफिरु ओव्हरहेड वायरवर चढला
Satara Karad mentally ill man climbs on electric pole

VIDEO : कराडमध्ये माथेफिरु ओव्हरहेड वायरवर चढला

| Updated on: Apr 03, 2021 | 2:41 PM

साताऱ्यातील कराड रेल्वे (Karad railway station) स्थानकावरील एक खळबळजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सातारा : साताऱ्यातील कराड रेल्वे (Karad railway station) स्थानकावरील एक खळबळजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक माथेफिरु विद्युत प्रवाहाच्या ओव्हर हेड वायरवर (Overhead cable) चढून त्याने स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. कालचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. रंगपंचमी खेळत असलेल्या तिथल्या  युवकांनी त्याला खाली उतरवले. गेल्या दोन दिवसापासून तो या परिसरामधील लोकांना त्रास देत होता. अनेकवेळा त्याला पकडण्याचाही प्रयत्न झाला होता. काल अखेर त्याला शिडी लावून युवकांनी ओवरहेड वायरवर चढून खाली उतरवले. (mentally challenged young man climbed the electricity pole at Karad, Satara)

या वायरमध्ये विद्युत प्रवाह नसल्यामुळे पुढचा अनर्थ टाळा. मिरज ते पुणे असा विद्युत प्रवाहावर चालणारी रेल्वे यंत्रणा उभी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या वायरमध्ये कोणताही विद्युत प्रवाह नसल्यामुळे या माथेफिरूचे प्राण वाचले. त्याच्याजवळ एक बॅगही सापडली आहे. मनोरुग्ण मूळचा झारखंडचा असून कराड येथे मजुरी करत असलेलया नातेवाईकांकडे आला होता.

संबंधित बातम्या  

सोलापुरात अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच रक्त सांडलं, लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला संपवलं!

Published on: Apr 03, 2021 02:23 PM
Corona Vaccine बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, ऐका डॉक्टरांचा सल्ला
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 April 2021-TV9