‘मी रायगडचा पालकमंत्री झालो नाही, पण…’; भरत गोगावले यांचे सुचक वक्तव्य

| Updated on: Jul 19, 2023 | 2:43 PM

पुढील ५ दिवसात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या कोकणातील अतिवृष्टीमुळे रायगडमध्ये सध्या पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

रायगड, 19 जुलै 2023 | राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर येत्या पुढील ५ दिवसात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या कोकणातील अतिवृष्टीमुळे रायगडमध्ये सध्या पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावेळी आपण रायगडचे पालकमंत्री झालो नाही, मग काय बिघडलं असं म्हणताना, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आहेत. आणि सामंत असल्यामुळे या पुराचा काही परिणाम होईल असे मला वाटत नसल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर पुर परिस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफ टीम तयार आहे. त्याचबरोबर शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे. तर याच्याआधीच जो गाळ काढला त्यामुळे महाड आणि त्यासोबतच चिपळूण या ठिकाणी पुर आलेला नाही. पण जर असाच पाऊस झाला तर पुर येऊ शकतो. सध्या यावर नियंत्रण ठेवण्याचे फार मोठा आव्हान असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 19, 2023 02:43 PM
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, नाना पटोले यांनी प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरलं!
बोगस बियाण्यांच्या मुद्यावरुन सभागृहात गदारोळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर!