कल्याण डोंबिवली वादळी वाऱ्यासह मुरळधार पाऊस
वादळी वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवली भागात वीज पुरवठा खंडीत झाला. तर डोंबिवली पूर्व पाथर्डी परिसरात इंटरनेट केबलला आग लागली.
कल्याण डोंबिवली : हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार काल (दि.16) राज्यातील अनेक भागात पाऊस पडला. अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झाले तर जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवली भागात वीज पुरवठा खंडीत झाला. तर डोंबिवली पूर्व पाथर्डी परिसरात इंटरनेट केबलला आग लागली. कल्याण डोंबिवली भागात ढगाच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला. तर इंटरनेट केबलला भर रस्त्यात आग लागल्याने वाहन चालक व नागरिकाची उडाली तारांबळ उडाली. याची माहिती मिळतात अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळ वर दाखल होत आगेवर मिळवले नियंत्रण मिळवले.
Published on: Mar 17, 2023 07:40 AM