चिमणीची ब्ल्यू टिक उडाली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेकांना ट्विटर झटका
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी यांच्यासह अनेकांची ब्ल्यू टिक हटवली आहे. यामध्ये राज्यातील मुख्य नेत्यांच्या नावाचा उल्लेख आहे
नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने एका झटक्यात अनेक यूजर्सना झटका देत त्यांची चिमणीच काढून घेतली आहे. अनेक यूजर्स हे ब्ल्यू टिक मिळाल्याने आनंदात होते. मात्र आता त्यांचे ब्ल्यू टिक हटवल्याने यूजर्स नाराज झाले आहेत. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी यांच्यासह अनेकांची ब्ल्यू टिक हटवली आहे. यामध्ये राज्यातील मुख्य नेत्यांच्या नावाचा उल्लेख आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू विराट कोहली या सर्वांची ब्ल्यू टिकही काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता निळ्या चिमणीसमोर ब्ल्यू टिक हवी असेल तर पैसे मोजावे लागणार आहेत.
Published on: Apr 21, 2023 08:50 AM