अंबरनाथमध्ये चोरट्यांचा दुधावर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
चोरट्यांनी चक्क दुधावर डल्ला मारल्याचा प्रकार अंबरनाथमधून समोर आला आहे. सायकलवर आलेल्या चोरट्यांनी दुधाचा ट्रे घेऊन पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अंबरनाथमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी चक्क दुधावर डल्ला मारला आहे. सायकलवर आलेल्या चोरट्यांनी चक्क दूध विक्रेत्याचा ट्रे घेऊन पोबारा केला. शिवाजी नगर परिसरात ही घटना घडली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहिल्यांदाच दुधाची चोरी करण्यात आलेली नाही, तर या आधी देखील दुधावर डल्ला मारण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांमधील ही तिसरी घटना आहे. चोरट्यांवर करावाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
Published on: Jun 12, 2022 09:34 AM