ठाकरेगट-वंचित युतीनंतर एमआयएमची मोठी खेळी, आंबेडकर घराण्यातील ‘या’ व्यक्तीसोबत हात मिळवणी करणार?

| Updated on: Jan 31, 2023 | 9:11 AM

एमआयएम राज्यातील मोठ्या दलित संघटनेशी आघाडी करण्याची शक्यता आहे. वंचितचा हात सोडल्यानंतर एमआयएम नव्या दलित संघटनेला सोबत घेणार असल्याची माहिती आहे. पाहा...

औरंगाबाद : एमआयएम राज्यातील मोठ्या दलित संघटनेशी आघाडी करण्याची शक्यता आहे. वंचितचा हात सोडल्यानंतर एमआयएम नव्या दलित संघटनेला सोबत घेणार असल्याची माहिती आहे. आंबेडकर घराण्यातील व्यक्तीलाच सोबत घेण्यासाठी एमआयएमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्याशी एमआयएम आघाडी करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

एमआयएमकडून आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिना दोन महिन्यांत रिपब्लिकन सेना आणि एमआयएमची आघाडी घोषित होण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या अंतर्गत सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला गोपनीय माहिती दिली आहे. महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेणार असल्याची माहिती आहे.

Published on: Jan 31, 2023 08:22 AM
…तर आम्ही देखील शांत बसणार नाही, इम्तियाज जलील यांचा इशारा
किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरे यांना कायमचे…