दुर्दैव आमच्यावर औरंगजेब आणि जिल्ह्याचं नवीन नाव थोपलं जात आहे : जलील

| Updated on: Mar 06, 2023 | 7:44 PM

नामांतरणावरून शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम जलील करत असल्याची टीका होत असताना त्यांनी आपली भूमिका मांडली. आमचे हे दुर्दैव आहे की आमच्यावर औरंगजेब आणि जिल्ह्याचे नवे नाव छत्रपती संभाजीनगर थोपले जात आहे. आमच्या त्या औरंगजेबशी काही संबंध नाही असे म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्याविरोधात साखळी उपोषण पुकारलं आहे. यावेळी तेथे औरंगजेबचे पोस्टर झळकावण्यात आले. तसेच बिर्याणीच्या पंगती उठल्या. यावरून त्यांच्यावर औरंगजेबच उदात्तीकरण केले जात असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर आता शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम ते करत असल्याचेही टीका केली जात आहे. त्यावर जलील यांनी आपली भूमिका मांडताना, आमचे हे दुर्दैव आहे की आमच्यावर औरंगजेब आणि जिल्ह्याचे नवे नाव छत्रपती संभाजीनगर थोपले जात आहे. आमच्या त्या औरंगजेबशी काही संबंध नाही असे म्हटलं आहे. तर कुठे ना कुठे होत असलेल्या घटनेचा संबंध हा आपल्याशी जोडला जातो. पण आपण कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे

Published on: Mar 06, 2023 07:44 PM
ठाकरे यांच्या सभेला काँग्रेस-राष्ट्रवादीने कार्यकर्ते पाठवले, बावनकुळे यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार? संजय राऊत यांनी काय दिले संकेत?