Special Report | ठाकरेंची ललकार, ओवैसी का गपकार?
राज ठाकरे यांनाही या इफ्तार पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र राज ठाकरे औरंगाबादेत असतानाच ओवैसींचे औरंगाबादेत येण्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
औरंगाबाद : राज ठाकरे सभेसाठी आज औरंगाबादमध्ये दाखल झाले. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी दाखल झाले. याशिवाय राज ठाकरे यांनाही या इफ्तार पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र राज ठाकरे औरंगाबादेत असतानाच ओवैसींचे औरंगाबादेत येण्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.