‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजने संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी दिले महत्वाचे आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' राबविताना आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असली तर या योजनेसाठी सर्वसामान्य महिलांना अडचणी येत आहेत. त्यामुळे महीला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी खास आदेश जारी केले आहेत.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये बॅंकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतू अनेक महिलांची बँकेत खाती नसल्याने त्यांची अडचण होत आहे. त्यामुळे बँकांना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आदेश दिले आहेत. ज्या महिलांची बँकेत खाती नसतील त्यांची खाती उघडण्यासाठी त्यांना योग्य ते सहकार्य करावे असे आदेश बँकांना दिल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‘मुळे ज्या महिलांची बँकेत खाती नव्हती अशा महिलांची देखील बँकेत खाती निर्माण होत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे तटकरे यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ थेट महिलांच्या बँकेत निधी जमा होणार आहे. त्यामुळे बॅंकेत खाती असणं हे महत्वाचे आहे. शिवाय हे खातं केवायसी असणे हे देखील गरजेचे आहे. आधारकार्डशी हे खाते संलग्न करावे लागणार आहे, तरच बँकेत थेट निधी येऊ शकणार आहे.