VIDEO | ‘फोटोची विटंबना झाल्यावर लोक कोर्टात जातात!’, शरद पवार यांना फोटोवरून अजित पवार गटाच्या नेत्याचे डिवचले
दोन एक दिवसांच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या फोटो वापरण्यावरून अजित पवार गटाला इशारा दिला होता. त्यावरून छगन भुजबळ यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांनी बीड येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात सभा घेत जोरदार टीका केली. त्याच्याआधी पवार यांनी अजित पवार गटाला निर्वानीचा इशारा दिला. तर आपला फोटो वापरला तर त्याच्याविरोधात कोर्टात जाऊ असे ते म्हणाले होते. त्यावरून आता अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी थेट पवार यांनाच डिवचले आहे. फोटो वापरण्यावरून भुजबळ यांनी पवार यांना खोचक टोला लगावताना, याच्याआधी पवार साहेबांनीच मी कोर्टबाजी करणार नाही असं म्हटलं होतं. पण आता फोटोवरून ते कार्टाचा इशारा देत आहेत. फोटोची विटंबना झाल्यावर लोक कोर्टात जातात. पण आदरानं फोटो वापरल्याने कोणी कोर्टात जात असं तर मी ऐकलं नाही असा टोला लगावला आहे. त्यामुळे यावरून आता अजित पवार गट आणि शरद पवार गटात कलगितूरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.