मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र खाते वाटप कधी? छगन भुजबळ म्हणतात, ‘चिंता करण्याचे काम नाही’
खाते वाटपावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला होता. त्यांनी, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे असे टोलेजंग नेते राष्ट्रवादीतून घेतल्यावरही त्यांना बिनखात्याचे मंत्री केल्याची टीका केली आहे.
मुंबई : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा होऊन 10 दिवस होत आहेत. इतके दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी समोर येत होती. त्यानंतर खाते वाटपावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला होता. त्यांनी, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे असे टोलेजंग नेते राष्ट्रवादीतून घेतल्यावरही त्यांना बिनखात्याचे मंत्री केल्याची टीका केली आहे. तर अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ बिनखात्याचे मंत्री असल्याची टीका केली होती. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही एक महिन्यानंतर खाते वाटप आणि विस्तार झाला असे म्हणताना, खाते वाटपाची चिंता करण्याचे काम नसल्याचे म्हटलं आहे.
Published on: Jul 10, 2023 01:33 PM