मैदान पाहायला गरीब लेकरं 200 मोटरगाड्या घेऊन मुंबईला गेले, हे सर्व गरीब ? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्ला

| Updated on: Jan 06, 2024 | 8:13 PM

पंढरपूर येथील ओबीसीच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यांची गरीब लेकरं बाळं मुंबईला मैदान बघायला 200 जेसीबी गाड्या घेऊन गेली. आपल्या समोर बसलेली भटक्या विमुक्त जाती जमातीची लेकरं श्रीमंत आहेत का? आरक्षण मिळालं असले तरी आजही झोपड्यांमध्ये रहाणारा सर्वाधिक समाज कोणता आहे असा सवाल करीत आरक्षण हा काय गरीबी हटावाचा कार्यक्रम आहे काय ?

पंढरपूर | 6 जानेवारी 2024 : ओबीसीच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची सभा झाली. या सभेत मनोज जरांगे यांच्यावर नाव न घेता भुजबळ यांनी टीका केली. मुंबईला यांची लेकरं बाळं 200 गाड्या घेऊन उपोषणासाठी मैदान बघायला गेली. हे सर्व गरीब आहेत. आणि माझ्या समोर बसलेली सर्व भटक्या विमुक्त, साळी, तेली, कोळी, माळी हे काय श्रीमंत आहेत काय ? मुळात हे आरक्षण गरीबी आणि श्रीमंतीवर ठरत नाही. आरक्षण मिळाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत होतो असे नाही. हजारो वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना इतरांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्यावर ठरते. ओबीसींना 27 टक्के आहे तेही पूर्ण भरलेले नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे. मी मंत्री पद किंवा आमदारकीची पण पर्वा करीत नाही. की मला मुख्यमंत्री पद नको. परंतू गोरगरीबांची काळजी घेणारे सरकार राज्यात आले पाहीजे यासाठी आम्ही सर्वपरी प्रयत्न करणार असेही मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Published on: Jan 06, 2024 08:12 PM
असा झाला गॅंगस्टर शरद मोहोळ याचा गेम, पोलीसांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
ओबीसीतून संपूर्ण मराठाला समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, मंत्री छगन भुजबळ यांनी खडसावले