ओबीसीतून संपूर्ण मराठाला समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, मंत्री छगन भुजबळ यांनी खडसावले
ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही अशी मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात स्पष्टपणे सांगितले आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी कोणीही आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच असे स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही परंतू त्यांनी स्वतंत्रपणे आरक्षण घ्यावे असे म्हटले आहे.
पंढरपूर | 6 जानेवारी 2024 : ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पंढरपूरात आज घेण्यात आला. या मेळाव्याला संबोधन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. ओबीसी समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला आरक्षण पाहीजे ते स्वतंत्र घ्या. आमचा पाठींबा आहे. आजकाल सर्रास कुणबी खोट्या रीतीने सर्टीफीकीट वाटायचे काम सुरु आहे हे काय चालू आहे. हे थांबले पाहीजे असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांची लेकरं गरीब आहेत. 200 जेसीबी फुलं उधळण्यासाठी आहेत पण ते गरीब आहेत. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतो आहे. ते गरीब आहेत. गावातून छोट्या मिरवणूका निघायला हव्यात, कॅण्डल मार्च काढायला हवेत. ओबीसी एक करण्याच्या घोषणा करायला पाहीजेत. लोकांना कुणबी सर्टीफिकीट वाटणाऱ्यांवर लक्ष ठेवायला हवे असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.