…तर ओबीसींकडूनही आंदोलन होणारच; छगन भुजबळांचा निर्वाणीचा इशारा

| Updated on: Jan 26, 2024 | 3:03 PM

ओबीसींवर अन्याय झाला असं समजलं तर ओबीसींकडूनही आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूने विचार करून निर्णय घेईल. जी मते चुकीची आहेत, त्याला आम्ही विरोध करतो. ते करणारचं

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. छगन भुजबळांनी म्हटलं की, ओबीसींवर अन्याय झाला असं समजलं तर ओबीसींकडूनही आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूने विचार करून निर्णय घेईल. जी मते चुकीची आहेत, त्याला आम्ही विरोध करतो. ते करणारचं. असा छगन भुजबळांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

ओबीसींवर अन्याय झाला असं समजलं तर ओबीसींकडूनही आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूने विचार करून निर्णय घेईल. जी मते चुकीची आहेत, त्याला आम्ही विरोध करतो. ते करणारचं. असा छगन भुजबळांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडलं?

मराठा आरक्षणासंदर्भात आज मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेवर जरांगे पाटील यांची सकारात्मक भूमिका असल्याचं दिसत आहे. लवकरच मराठा आरक्षणावर तोडगा निघेल अशी सुत्रांनी माहिती देखील दिली.

Published on: Jan 26, 2024 03:03 PM
माझा मराठा आरक्षणाला पाठींबा, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न अजित पवार काय म्हणाले ?
Video | कर्तव्यपथावर घुमला शिवरायांचा जयजयकार, 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ