…तर आम्हालाही लोकांना खरं सांगावं लागेल; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा

| Updated on: Sep 25, 2022 | 10:20 AM

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा युवासेवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सत्ता गेली म्हणून आता घरोघरी फिरत असल्याचा टोला केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुन्हा एकदा युवासेवा प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सत्ता गेली म्हणून आता घरोघरी फिरत असल्याचा टोला केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.  तुमची सत्ता गेली म्हणून तुम्ही घरोघरी फिरत आहात, नाही तर तुम्ही तुमच्या ऑफीसला देखील येत नव्हतात. शिवसैनिकांना साधी तुमची भेट देखील मिळत नव्हती. आमच्यासारख्या ज्येष्ठ आमदार भेटीसाठी वर्षाबाहेर उभे होते. मात्र सत्ता गेल्यानंतर आता घरोघरी फिरत आहात असा घणाघात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे. आता आम्हालाही सत्य सांगत फिरावं लागेल, मात्र आम्ही आमची काम पूर्ण करून यात्र काढू असा टोलाही यावेळी दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

 

 

 

Published on: Sep 25, 2022 10:20 AM
विदर्भवादी नेते राज ठाकरेंविरोधात आक्रमक;  ‘या’ नेत्याने राज ठाकरेंना म्हटलं सुपारीबाज 
पीएफआय संघटनेवर कारवाईसाठी भाजप,आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांचं महत्वाचं पाऊल