जळगावात येणार गुजरातचं खत बोगस? भाजप नेत्यानंच केला आरोप; म्हणाला, ‘हजारो शेतकऱ्यांचं नुकसान’

| Updated on: Jul 18, 2023 | 3:34 PM

ज्यामुळे शेतकऱ्यांचे उभं पीक हे जमिनधोस्त होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावरून राज्य शासनाने आता कडक पावले उचलली आहेत.

जळगाव,18 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते वितरीत केली जात आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उभं पीक हे जमिनधोस्त होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावरून राज्य शासनाने आता कडक पावले उचलली आहेत. तर जे बोगस खते आणि बियाणे वितरित करतात त्यांच्यावर चाप लावण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून लवकर कायदा केला जाईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना महाजन यांनी, जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या संदर्भात महाजनांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर या समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. तर यावेळी महाजन यांनी हे बोगस खते आणि बियाणे गुजरातमधून येत असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 18, 2023 11:34 AM
धक्कादायक! शिंदे गटाच्या मंत्र्याला धमकी, खंडणी उकळण्याचा प्रयत्न
काका-पुतण्यात अंतर वाढलं का? पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेसह अजित पवार राहणार उपस्थित