Girish Mahajan on Khadse : एकनाथ खडसेंनी स्वप्न बघायला काय हरकत आहे? आणा तुमचं सरकार आणि व्हा मंत्री
ते आमदार आणि खासदार आहेत, काही हरकत नाही स्वप्न बघायला. फक्त सत्यात आणा. मंत्री गिरीष महाजन यांचा राऊतांसह खडसेंना सल्ला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. यानंतर आतापर्यंत हे खोके सरकार जाईल असे मविआचे नेते सतत म्हणत असतात. यावरून आता पुन्हा एकदा कलगितूरा पाहायला मिळत आहे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे सरकार लवकरच जाईल असं म्हटलं आहे. तर त्यावर एकनाथ खडसेंनी देखिल शिंदे गटाचा कार्यक्रम भाजपच करेल असे म्हटलं होतं. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
महाजन यांनी, राऊत हे खासदार तर एकनाथ खडसे हे आमदार आहेत. त्यामुळे हे सरकार पाडावं आणि सत्ता आणावी. फक्त स्वप्न पाहू नये. तसेच एकनाथ खडसेंनी स्वप्न बघायला काय हरकत आहे? असाही चिमटा काढला आहे.
Published on: Jan 02, 2023 05:57 PM