Minister Girish Mahajan : पुढच्या यादीत सर्वांची नाराजी दूर होईल, गिरीश महाजनांचं सूचक विधान
Minister Girish Mahajan : पालकमंत्री कोण कोणत्या जिल्ह्याचा, हे ठरलेलं नाही. अजून तरी मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री नाही. पुढच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान देऊ, असं गिरीश महाजन यावेळी म्हणालेत.
नाशिक : देशात आज स्वातंत्र्याच्या (Independence Day News) अमृत महोत्सवाचा (Azadi ka Amrit Mahotsav) उत्साह आहे. नाशकातही ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी वेगवेगळ्या मुद्य्यंवर भाष्य केलंय. ते मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना महाजन म्हणाले की, ‘ अजून मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. पुढच्या यादीत सर्वांची नाराजी दूर होईल. खातं कुठलंही असू द्या प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, त्या खात्याचा लाभ, त्याचा उपयोग जनतेला व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मला ग्रामविकास खातं मिळालं आहे. कारण मी ग्रामीण भागातीलच आहे. मेडिकल एज्युकेशन हे खातं देखील माझ्याकडे आहे. क्रीडा खातं, देखील माझ्याकडे आहे. मी शालेय जीवनापासून खेळाडू आहे. या माध्यमातून मला चांगल्या खेळाडूंना न्याय देता येईल. पालकमंत्री कोण कोणत्या जिल्ह्याचा, हे ठरलेलं नाही. अजून तरी मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री नाही. पुढच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान देऊ, असं महाजन यावेळी म्हणालेत.