gulabrao patil | शिंदे गटात सहभागी होताना सर्वच देव आठवले होते गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

gulabrao patil | ‘शिंदे गटात सहभागी होताना सर्वच देव आठवले होते’ गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 31, 2022 | 8:07 PM

देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळालं आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठिशी उभे राहतील अशी प्रार्थना बापाकडे केली आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

जळगाव : शिंदे गटात सहभागी होतानाचा जो निर्णय घेतला त्यावेळी गणपती बाप्पाचं नव्हे तर अक्षरशा सर्व देव आठवले होते. उद्धव ठाकरेंचे साथ सोडून शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेल्या गुलाबराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे गटात सहभागी होतानाचा जो निर्णय घेतला त्यावेळी गणपती बाप्पाचं नव्हे तर अक्षरशा सर्व देव आठवले होते, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. राजकारणासाठी कुठलेही क्षेत्र संकट हे येत असतात, त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पाची आठवण येते. आम्ही ज्यावेळेस शिंदे गटात सहभागी झालो होतो त्यावेळी सर्वच देव आठवले होते. देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळालं आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठिशी उभे राहतील अशी प्रार्थना बापाकडे केली आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Published on: Aug 31, 2022 08:07 PM
Video : ‘फुकट पगार घेता का %$@#$#’ आणि संतोष बांगर भडकले, फोनवरुनच अधिकाऱ्याला झापले
CM Eknath Shinde| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ठाण्यातील गणेश मंडळांना भेट; जुन्या आठवणीत रमले