VIDEO | ‘कोल्हापुरी नाही, कापशीचं पायतान करकर वाजयतय. ते बसलकी कळेल त्याला’; आव्हाड यांना मुश्रीफ यांचे चोख प्रत्युत्तर
शरद पवार यांच्या पार पडलेल्या निर्धार सभेत पवार यांच्यासह त्यांच्या गटातील अनेक नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर घणाघाती टीका केली होती.
कोल्हापूर : 26 ऑगस्ट 2023 | कोल्हापूर येथील दसरा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची निर्धार सभा पार पडली. या सभेत अध्यक्ष शरद पवार यांच्यासह रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर टीका केली. यावेळी आव्हाड यांनी, जे बाहेर गेले ते गद्दार निघाले. त्यांना कोल्हापुरी पायतान दाखवण्याची वेळ आली आहे अशी टीका केली होती. त्या टीकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार करताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी मुश्रीफ यांनी आव्हाड यांचा समाचार घेताना, ते आपल्याला फार ज्युनिअर आहेत. तर त्यांनी ठाण्यात राष्ट्रवादी संपवली. तर त्यांनी पवार यांच्यावर कोणती जादू केली आहे काय माहित अशी टीका केली आहे. तर आव्हाड यांच्या कोल्हापुरी पायतान या टीकेवर पलटवार करताना आव्हाड यांना टोला लगावता, अशी भाषा करायची असेल तर आव्हाड यांना सांगावं लागेल की येथे कोल्हापूर चप्पल नाही तर कापशीचं पायतान प्रसिद्ध आहे. आणि ते करकर वाजयत. ते बसलकी कळेल त्याला अशा शब्दात मुश्रीफ यांनी आव्हाड यांना इशारा दिला आहे.