‘पद मिळाल तर खुश व्हायचं नाही मिळाल तर नाराज असं चालत नाही’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला

| Updated on: Jul 31, 2023 | 10:25 AM

याचदरम्यान अनेक पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीवरून आढावा देखील घेत आहेत. याला भाजपही अपवाद नाही. भाजपकडूनही कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा घेतल्या जात आहे. असाच मेळावा नागपूरमध्ये पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्षपदी नियुक्त सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली.

नागपूर : काही महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यात महापालिका आणि लोकसभेच्या निवडणूका लागू शकतात. त्याच्याआधी सगळेच पक्ष आप आपल्या पक्षांच्या मोर्चे बांधणाला लागले आहेत. याचदरम्यान अनेक पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीवरून आढावा देखील घेत आहेत. याला भाजपही अपवाद नाही. भाजपकडूनही कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा घेतल्या जात आहे. असाच मेळावा नागपूरमध्ये पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्षपदी नियुक्त सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांवरून नेत्यांचे कान टोचले. त्यांनी नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व सांगताना, भाजपला आज जे चांगले दिवस आले आहेत ते फक्त कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच. त्यामुळे कार्यकर्त्याला विसरून चालणार नाही, तो दुरावणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला गडकरी यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. तर पद मिळाल तर खुश व्हायचं नाही मिळाल तर नाराज असं चालत नाही. आपल्या पक्षात जे पद मिळालं ते जबाबदारीने पार पाडायचं असतं असेही गडकरी यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 31, 2023 10:25 AM
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार, नेमकं काय घडलं? रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितली थरारक घटना!
‘मोदीजी, मन की बात बंद करा…’, युवक काँग्रेसकडून का अन् कुठं झळकले पोस्टर्स?