Chandrakant Patil : बाबरी प्रकरण, चंद्रकांत पाटलांविरोधात सोलापुरात अनोखे आंदोलन

| Updated on: Apr 13, 2023 | 2:16 PM

सोलापुरमधील माळशिरस येथे असेच आंदोलन करण्यात आले असून त्या आंदोलनातील पोस्टरची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी पाडली नाही, असे वक्तव्य केले होते

सोलापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राज्यातले राजकारण चांगले तापलेलं आहे. तर भाजप पक्षश्रेष्ठी आणि पक्षातले नेते मंडळी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज झाले आहेत. तर राज्यात अनेत ठिकाणी ठाकरे गटाकडून आंदोलन केली जात आहेत. सोलापुरमधील माळशिरस येथे असेच आंदोलन करण्यात आले असून त्या आंदोलनातील पोस्टरची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी पाडली नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमधून आता प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्हा युवा सेनेचे गणेश इंगळे यांनी चंद्रकांत पाटलांचे विरोधात आंदोलन केले. चंद्रकांत पाटलांच्या डोक्यावर खोबरेल तेल लावून त्यांचे डोके शांत करण्याचे अनोखे ठाकरे शैलीतील आंदोलन यावेळी करण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावेत अन्यथा त्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

Published on: Apr 13, 2023 02:16 PM
आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्यच; अंबादास दानवे यांचं वक्तव्य
आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एका वाक्यात उत्तर