‘आमचा संसार सुखाचा, आमची काळजी त्यांनी करण्याची गरज नाही’; पटोले यांच्यावर कोणी केलीय खरमरित टीका
त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा हा मुख्यमंत्री खुर्चीवर असून शिंदे यांनी सावधान राहावं असं म्हटलं आहे. तर मित्र म्हणून शिंदे यांना सल्ला देते की त्यांनी सावध राहावं. त्यांच्या मुख्यमंत्री खुर्चीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा डोळा आहे.
सातारा, 15 ऑगस्ट 2023 | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री खुर्चीवरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा हा मुख्यमंत्री खुर्चीवर असून शिंदे यांनी सावधान राहावं असं म्हटलं आहे. तर मित्र म्हणून शिंदे यांना सल्ला देते की त्यांनी सावध राहावं. त्यांच्या मुख्यमंत्री खुर्चीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा डोळा आहे. त्यावरून आता तापमान एकदा तापलं असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. देसाई यांनी, आमची काळजी नाना पटोले यांनी करण्याची गरज नाही. आमचा संसार सुखाचा चालू आहे. याविषयी अजित पवारांनी सांगितले आहे की आम्ही काही वेडे नाही. ती खुर्ची भरलेली आहे. कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. नाना पटोले यांनी फक्त वाट बघावी, यातील कोणत्याही खुर्चीकडे बघायची संधी देखील त्यांना मिळणार नाही, असा टोला देसाई यांनी पटोले यांना लगावलाय.