केवळ घोषणा करून आम्ही थांबणार नाही : शंभूराज देसाई

| Updated on: Mar 10, 2023 | 7:45 AM

विरोधकांनी हा बजेट म्हणजे स्वप्न दाखवणारा बजेट, तोंडाला पाने पुसणारा बजेट अशी टीका केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली

मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारचं 2022-23 चं बजेट मांडलं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्या ज्या योजना मांडलेल्या त्या पोहचतिल का असा सर्वात मोठा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. तर विरोधकांनी हा बजेट म्हणजे स्वप्न दाखवणारा बजेट, तोंडाला पाने पुसणारा बजेट अशी टीका केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षावरती टीका करायची, हे विरोधकांचे कामचं असतं. परंतु आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सगळ्या बाबींचा पुरेसा अभ्यास केलेला आहे. वित्तीय तरतूदीत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्याच्यासाठी तरतूद आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी नाही की केवळ घोषणा करून आम्ही थांबणार आहोत. घोषणा आज अर्थसंकल्पामध्ये झाल्यात उद्यापासूनच आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आम्ही तयार आहोत. आमच्याकडे निधीची कमतरता नाही निश्चितपणे या सगळ्या घोषणा पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे.

Published on: Mar 10, 2023 07:45 AM
संदीप देशपांडे यांच्या टीकेला किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर, पहा काय म्हणाल्या…
आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा, विरोधक आक्रमक होणार?, यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी