ठाकरे सेना राष्ट्रवादीच्या मांडीवर; Bhaskar Jadhav धुतल्या तांदळासारखे आहेत काय?
देसाई यांनी जाधव यांनी, तुम्ही किती दरवाजे फिरून ठाकरे गटात गेलात असाही सवाल केला आहे. तसेच जेव्हा योग्य वेळ येईल तेंव्हा जाधव यांच्या प्रवासावर बोलेन असाही इशारा त्यांनी दिला आहे. तर आताची शिवसेना ही तुम्ही राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली आहे असेही देसाई म्हणाले.
मुंबई : ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव हे पाठण दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता देसाई यांनी पलटवार करत ते काही धुतल्या तांदळासारखे आहेत काय? असा सवाल केला आहे.
यावेळी देसाई यांनी, जाधव यांनी फक्त टीका केली असती तर दुर्लक्ष केलं असतं. पण त्यांनी मला चोर असल्याचे म्हटलं आहे. तर आम्ही गदारी केली असेही ते म्हणतात. पण मला तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. हा तुमचा कितवा पक्ष आहे ते सांगावं.
तसेच देसाई यांनी जाधव यांनी, तुम्ही किती दरवाजे फिरून ठाकरे गटात गेलात असाही सवाल केला आहे. तसेच जेव्हा योग्य वेळ येईल तेंव्हा जाधव यांच्या प्रवासावर बोलेन असाही इशारा त्यांनी दिला आहे. तर आताची शिवसेना ही तुम्ही राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली आहे असेही देसाई म्हणाले.