बारसू रिफायनरीला विरोध असताना सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा, कातळशिल्पा बाबतही दिले लेखी उत्तर

| Updated on: Jul 24, 2023 | 10:37 AM

नाणारमध्ये होणारी रिफायनरीसाठी ही बारसू, सोलगाव, धोपेश्वर, गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे या गावांच्या मध्ये हलविण्यात येणार आहे. तर येथे त्यासाठी 6200 एकर जागा लागणार असून 2900 एकर जमिन देण्यास लोकांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतर यावरून लोकांच्या जनप्रक्षोभ उसळला होता.

मुंबई, 24 जुलै 2023 | रत्नागिरी जिल्ह्यात बारसू या गावात प्रस्तावित रिफायनरी होणार असून त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. नाणारमध्ये होणारी रिफायनरीसाठी ही बारसू, सोलगाव, धोपेश्वर, गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे या गावांच्या मध्ये हलविण्यात येणार आहे. तर येथे त्यासाठी 6200 एकर जागा लागणार असून 2900 एकर जमिन देण्यास लोकांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतर यावरून लोकांच्या जनप्रक्षोभ उसळला होता. यानंतर आतापर्यंत प्रशासनाला तोडगा काढला आलेला नाही. याचदरम्यान आता पुन्हा एकदा हा वाद उफाळण्याची शक्यता उद्भवली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बारसू रिफायनरीला विरोध असतानाही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी रत्नागिरीतील बारसू रिफायनरी ही ६२ कातळशिल्प वगळून केली जाईल. तर १७ कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी देखील निविदा काढल्या जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता रखडलेला बारसू रिफायनरी प्रकल्प पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबात मुनगंटीवार यांनी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर दिलं आहे. त्यामुध्ये याचा खुलासा झाला आहे.

Published on: Jul 24, 2023 10:37 AM
“गुलाबराव पाटील असंवेदनशील पालकमंत्री”, पूर परिस्थितीवरून रविकांत तुपकर यांनी सुनावले खडेबोल
“अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांचीही इच्छा”, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान