‘नकली बहादुर राजकाणात खूप…’; राज ठाकरे यांच्या कानपट्टीवर बंदूक या टीकेवर भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

| Updated on: Aug 17, 2023 | 9:07 AM

मनसे प्रमुख्य राज ठाकरे यांनी पनवेलमधील निर्धार मेळाव्यात जोरदार बॅटींग केली. त्यांनी भाजपवर पक्ष फोडीवरून टीका केली. तर कानपट्टीवर बंदूक ठेऊन भाजपात लोकांना घेत असल्याचा आरोप केला होता.

नागपूर : 17 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल भाजपवर जोरदार टीका केली होती. तर टोल फोडणाऱ्यांनी आधी पक्ष बांधणीकडे लक्ष द्या अशी टीका केली होती. त्यांनी ही टीका पनवेल येथील मनसेच्या मुंबई गोवा महामार्गाबाबत निर्धार मेळाव्यात केली होती. तसेच भाजपमध्ये लोकांना घेण्यासाठी कानपट्टीवर बंदूक लावतो असा देखील आरोप केला होता. त्यावरून भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता पलटवार केला आहे. मुनगंटीवार यांनी, कानपट्टीवर बंदूक ठेऊन भाजपमध्ये कोणी येत नाही. भाजप देशाच्या सेवेसाठी राष्ट्रभक्तीसाठी आहे, परिवाराच्या सेवेसाठी भाजप नाही. भारतीय जनतेची पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. इतरांना कमी लेखण्याचं कारण नाही. आपण एकटेच बहादूर आहे, आपल्या कानपट्टीवर कोणी पिस्तूल लावू शकत नाही असं वाटण्याचं कारण नाही असा टोला त्यांनी राज ठाकरे यांनी लगावला आहे.

Published on: Aug 17, 2023 09:07 AM
‘विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतच त्यांनी राहावं, दिल्लीचे एजंट…’; त्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला
‘राऊत यांची भविष्यवाणी म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने’; कुणी केलीय बोचरी टीका