…मी तेव्हाच म्हटलो होतो ‘मातोश्री’ची पायरी चढणार नाही , तानाजी सावतांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघात केला आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना जोरदार टीका केली आहे.
मुंबई : मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघात केला आहे. मविआ स्थापनेच्या आधीच मी ठणकावून सांगितलं होतं, हे मला पटणार नाही. मी मातोश्रीची पायरी देखील चढणार नाही आणि मी तसं केलं देखील असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी घराणेशाहीवरून देखील शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 ला युतीच्या काळात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होते. मात्र उपमुख्यमंत्रीपद घेतल्यास ते मला द्यावे लागेल असं त्यांना वाटले असावे म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतले नाही, असं एकनाथ शिंदे यांंनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
Published on: Sep 25, 2022 12:20 PM