Video: उद्योग खात्यामध्ये आधीच्या मंत्र्यांनी काय उद्योग केले हे शोधावे लागेल- उदय सामंत

Video: उद्योग खात्यामध्ये आधीच्या मंत्र्यांनी काय उद्योग केले हे शोधावे लागेल- उदय सामंत

| Updated on: Sep 18, 2022 | 8:49 AM

आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्योग खात्यात काय उद्योग झाले हे तपासून पाहणार असे उदय सामंत म्हणाले.

वेदांत प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाला तूर्तास पूर्णविराम लागेल असे चित्र सध्या दिसत नाही. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. उद्योग खात्यात काय सुरु आहे याबद्दल उद्योग मंत्र्यांना काहीही माहिती नाही असे म्हणत आदित्य यांनी सामंत यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्योग खात्यात काय उद्योग झाले हे तपासून पाहणार असे उदय सामंत म्हणाले. आधीच्या सरकारच्या काळात काय प्रपोजल होते याची माहिती घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Published on: Sep 18, 2022 08:49 AM
Breaking : शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे
…तर ‘वेदांता’ची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार ; उद्योगमंत्र्यांचं मोठं वक्तव्य