एसटी कामगारांच्या नावावर भाजप राजकीय पोळी भाजतंय – यशोमती ठाकूर
एसटी कामगारांचे आंदोलन शुक्रवारी चांगलेच चिरघळल्याचे पहायला मिळाले. एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या घराला घेराव घालता. मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून या आंदोलनाचा निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनाला भाजपच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला आहे.
एसटी कामगारांचे आंदोलन शुक्रवारी चांगलेच चिरघळल्याचे पहायला मिळाले. एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या घराला घेराव घालता. आंदोलनाला हिंसक वळन लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल आणि दगडफेक देखील केली. शरद पवार यांच्यामुळेच विलिनिकरण होऊ शकले नाही, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून या आंदोलनाचा निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनाला भाजपच जबाबदार अल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला आहे. एसटी कामगारांच्या नावावर भाजप राजकीय पोळी भाजत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.