मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अडचणवी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाची गळती थांबायचं नाव घेत नाही आहे. रोज एक एक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. अशातच आता मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Published on: Aug 07, 2023 02:47 PM