मुली बेपत्ता! राज ठाकरेंनी सांगितलं धक्कादायक कारण; ‘याला’ ठरविलं दोषी
मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढत चालल्याची चिंतेची बाब समोर आले होती. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून स्पष्ट झाली होती. त्यावरून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्य शासनाकडे अहवाल मागितला होता.
नाशिक : गेल्या चार एक दिवसांपुर्वी गेल्या तीन महिन्यापासून जवळपास 3500 पेक्षा जास्त महिला, मुली बेपत्ता झाल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्पष्ट केलं होतं. त्यावरून मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढत चालल्याची चिंतेची बाब समोर आले होती. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून स्पष्ट झाली होती. त्यावरून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्य शासनाकडे अहवाल मागितला होता. त्यानंतर ही गंभीर बाब उघड झाली. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी टीका करत धारेवर धरण्याचे काम केल. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धक्कादायक कारण सांगितलं आहे. त्यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यास सोशल मीडिया जबाबदार असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. मुली बेपत्त होण्यामागे मुख्यत: सोशल मीडिया कारणीभूत आहेत. यामाध्यमातून ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे अनेक गोष्टींसाठी बुद्धीला चालना मिळते. हे काही नव्याने घडत नाहीये असेही ते म्हणालेत.