Nitin Gadkari | मिशन ग्रीन, वृक्ष पुनर्रोपणाचा काय आहे प्लॅन, काय आहे नितीन गडकरी यांचा नवीन फॉर्म्युला !

| Updated on: Jul 17, 2022 | 3:50 PM

Nitin Gadkari on Tree Transplantation : राष्ट्रीय महामार्गावरील झाडे आणि इतर वृक्ष न कापता पुनर्रोपण करण्याचा नवा फॉर्म्युला नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय भूपृष्टीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे (National Highway) विस्तृत जाळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मोठ्या प्रमाणावर महामार्गाचे काम सुरु आहे. या विकास कामा दरम्यान झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते. ही कत्तल वाचवण्यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता वृक्ष न कापता त्याचे पुनर्रोपण (Tree Transplantation) करण्यात येत असल्याची माहिती गडकरी यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दिली. तसेच 2030 पर्यंत पंतप्रधानांच्या योजनेनुसार भारत जल, हवा आणि जमीन प्रदुषण मुक्त (Pollution Free) करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत एक दहा किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग NHIA तयार करत आहे. या ठिकाणी बाधित होणारी 12000 झाडांचे पुनर्रोपण केल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये एका ठिकाणी 6000 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. चारधाम बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमोनोत्रीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही झाडं तोडण्यात येणार नाहीत तर त्यांचं पुनर्रोपण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

ई टॅगिंगमुळे करा खात्री

तसेच महामार्गावरील वृक्षांना न कापता त्यांचे पुनर्रोपण करताना त्या झाडांना ई-टॅग (E Tag) करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कामात पारदर्शकता राहून लोकांना कोणते झाड, कोणत्या ठिकाणी पुनर्रोपीत करण्यात आले याची माहिती त्यांना बघता येईल आणि त्याची खात्री ही करता येईल असे ते म्हणाले.

भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपरक्त तुटला
Anil Bonde on Sanjay Raut | कोणी केला शिवसेना घात? काय म्हणाले अनिल बोंडे? कोणावर केली बोंडेंनी घणाघाती टिका