कृषि पथकाच्या धाडीवरून अब्दूल सत्तार यांच्यावर राष्ट्रवादी नेत्याचे गंभीर आरोप; केला पैसे उकळल्याचा दावा
तर याच पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी यांचाही समावेश आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावरून अब्दूल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
अकोला : येथे कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं एमआयडीसीमध्ये धाडी टाकल्या आहेत. मात्र या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. तर याच पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी यांचाही समावेश आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावरून अब्दूल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी, या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच हाच आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं देखील केला आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेयेत. तर मिटकरी यांनी याप्रकरणी आपण राज्यपल यांची घेणार भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच रक्त पिण्याचे पाप कृषी मंत्री अब्दुल सत्तार करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
Published on: Jun 10, 2023 12:41 PM