अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीवर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया!, म्हणाले…
अजित पवार यांना डावललं गेलं असे म्हणत ते नाराज असल्याचं बोललं जात असतानाच त्यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाची जबाबदारी द्या अशी मागणी केली. तेव्हा पासून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा सांगितल्याचं बोललं जात आहे.
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भाकरी फिरली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचा वर्धापन दिन झाला. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफूल्ल पटेल यांच्यावर नवी जबाबदारी देत त्यांची नियुक्त करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांना डावललं गेलं असे म्हणत ते नाराज असल्याचं बोललं जात असतानाच त्यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाची जबाबदारी द्या अशी मागणी केली. तेव्हा पासून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा सांगितल्याचं बोललं जात आहे. यावरून सध्या पक्षात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी 2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी व पक्षात कडक शिस्त लागावी यासाठी अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करावं असं म्हटलं आहे. तर यावर निर्णय हा शरद पवार घेतील असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.