अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार? आ. आशिष जैसवाल म्हणतात, ‘जनतेची इच्छा आहे…’
तर याबाबत शिंदे गटाचे नेते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी हे वक्तव्य करताना, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल असेही म्हटलं होत.
नागपूर, 02 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये आता लवकरच मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याची शक्यता आहे. हा विस्तार याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर याबाबत शिंदे गटाचे नेते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी हे वक्तव्य करताना, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल असेही म्हटलं होत. त्यानंतर आता मंत्रिमंडळ होण्याच्या चर्चांना उत आला आहे. त्यामुळे नाराज आमदारांना पुन्हा एकदा आपला नंबर लागेल अशी आशा आहे. यावरून आमदार आशिष जैसवाल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जैसवाल यांनी, मंत्रीमंडळ विस्तार करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे म्हटलं आहे. तर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं असेही त्यांनी म्हटलं आहे. तर अधिवेशनानंतर विस्तारात आपला नंबर लागणार का या प्रश्नावर त्यांनी, माझ्या पेक्षा माझ्या मतदारसंघातील जनतेची इच्छा तशी असल्याचे म्हटलं आहे. Shinde-Fadnavis-Pawar Government Cabinet Expansion