‘जरांगे यांनी सागर बंगल्यावर जाऊ…,’ काय म्हणाले बच्चू कडू

| Updated on: Feb 25, 2024 | 7:13 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना जरा सबूरीचा सल्ला दिला आहे. त्यांची आपण उद्या भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

अमरावती | 24 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत शांततेने आंदोलन केले आहे. त्यांची उंची या आंदोलनाने वाढली आहे, काही शक्ती या आंदोलनाला वेगळ वळण लागावे यासाठी कार्यरत आहेत. जरांगे पाटील यांनी त्यास बळी पडू नये. प्रत्येकाचा मागण्याचा हक्क आहे. त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करु नये. उद्या या आंदोलनात काही वेगळं घडलं तर चुकीचा संदेश जाईल. त्यांच्या व्यक्तीमत्वाला डाग लागला तर चुकीचं होईल.अजय महाराज बारस्करांचे आरोप चुकीचे आहे. जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी व्यक्तीगत टिका टीपण्णी करु नये, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यांना थांबवा असे लोक रडून मला फोन करीत आहेत असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मी त्यांना पक्षातून काढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 25, 2024 07:12 PM
WITT Global Summit : अनुराग ठाकूर स्पष्टच म्हणाले, 70 वर्षांचा भ्रष्टाचार हद्दपार करायला वेळ लागेल पण गर्वानं सांगतो…
WITT Global Summit : अभिनेत्री रवीना टंडन हिचा टीव्ही 9 नेटवर्क ‘नक्षत्र सन्मान’ पुरस्कारानं गौरव