‘ते वक्तव्य म्हणजे नालायकी’; संभाजी भिडे याच्यांवर बच्चू कडू भडकले
याचदरम्यान त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी भिडे यांना अटक करावी अशी मागणी केली. त्यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील संपात व्यक्त केला आहे.
अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दोन एक दिवसांपुर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. याचदरम्यान त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी भिडे यांना अटक करावी अशी मागणी केली. त्यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील संपात व्यक्त केला आहे. तसेच असेच जर वक्तव्य एखाद्या परधर्मीयांना किंवा दुसऱ्या धर्मातल्या माणसानं केलं असतं तर आतापर्यंत लोकांनी तांडव केला असता. पण असे वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. त्याचं हे वक्तव्य म्हणजे देशद्रोच आहे. तर असं वक्तव्य करणं हे नालायकी आहे अशी घणाघाती टीका केली आहे. वंदे मातरम गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही, तर रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ हे गीत सुचलं” असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.