MLA Bachhu Kadu :आमदार बच्चू कडू यांना आज सेशन कोर्टात हजार राहण्याचे आदेश
कडू यांनी संबंधित अधिकाऱ्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला मारहाण केली होती. आज ते ३ वाजता न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई – आमदार बच्चू कडू (MLA Bachhu Kadu )यांना आज सेशन कोर्टात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2011 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडू यांनी संबंधित अधिकाऱ्याने(Officer) समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला मारहाण केली होती. आज ते 3 वाजता न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांना रस्ते घोटाळा प्रकरणातून दिलासा(Relief) मिळाला होता. या प्रकरणात रस्त्यांच्या कामांचा निधी लुटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.