आपतकालीन कक्षाबाहेरच खड्डे पाहून बच्चू कडू चांगलेच संतापले; म्हणाले, “मी मुख्यमंत्री…”

| Updated on: Jun 11, 2023 | 1:40 PM

सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता आणि आपतकालीन कक्षाबाहेर पडलेले खड्डे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांसह पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेत कानउघडणी केली.

अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता आणि आपतकालीन कक्षाबाहेर पडलेले खड्डे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांसह पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेत कानउघडणी केली. यानंतर त्यांनी, आरोग्यकडे कोरोनानंतर सरकारने जास्त द्यायला पाहिजे होतं अशी खंत व्यक्त करताना आपण याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. तर आरोग्यासंदर्भात खास उपक्रम राबवण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. तर हा खास उपक्रम गरीबांशी संबंधित आहे. आपल्याकडे आरोग्याच्या योजना चांगल्या आहेत, पण सरासरी लोकांची खासगी रुग्णालयात गेले तर तिथेही फसवणूक होते, योजनेत बसत नाहीत आणि शेवटी त्यांना सरकारी रुग्णालयात यावं लागतं,” असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

Published on: Jun 11, 2023 01:40 PM
Mumbai Megablock | मुंबईकरांनो आज रेल्वेने प्रवास करताय? मग हा व्हिडीओ नक्की बघा
मान्सूनपूर्व पेरणीला वेग; मजूर नसतानाही शेतकऱ्यानं फुलवली शेती